आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताब्यात:गवत जाळल्यावर खून झालेल्या अमळनेरच्या  तरुणाचा आढळला मृतदेह, संशयित ताब्यात

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अंबोडे गावाच्या शिवारात गुरुवारी सायंकाळी अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. चौकशीअंती हा मृतदेह अमळनेर येथील ज्ञानेश्वर राठोडचा असल्याचे समोर आले आहे. शेतबांधावरील गवत जाळल्यानंतर हा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी धुळे तालुका पेालिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी संशयित जगदीश राठोलडाला ताब्यात घेतले आहे. अंबोडे शिवारातील येथील दगडू जगताप यांच्या शेत बांधावरील गवत मोठे झाले होते. हे गवत त्यांनी जाळले. त्यावेळी गवतांमध्ये फेकलेला मानवी मृतदेह ही आढळून आला. आगीमुळे या मृतदेहावरील कपडे ही काही अंशी जळाले होते. यानंतर शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या मदतीने धुळे तालुका पोलिसांना कळवले. काही वेळातच पोलिस अधिकारी दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक सागर काळे व पथक दाखल झाले. यानंतर चौकशीला सुरुवात करण्यात आली. मृतदेहाच्या पोटावर पोलिसांना काही वार आढळून आले. त्यामुळे मृतांच्या पोटातील अवयव ही बाहेर आले होते. याशिवाय जवळच एक दगड ही मिळाला आहे. त्यामुळे अज्ञात मारेकऱ्याने खून केल्याचे स्पष्ट झाले. परंतु तरुणाची ओळख मात्र पटली नव्हती. चौकशी अंती अंबोडापासून सुमारे १० कि.मी. अंतरावर असलेल्या व अमळनेर तालुक्यातील रणाईचेतांडा गावातून बेपत्ता ज्ञानेश्वर रामभाऊ राठोड ( वय २३ ) याची माहिती मिळाली. ज्ञानेश्वर हा बेपत्ता होता. धुळे तालुक्यातील नवलनगर या ठिकाणी विटा भट्टीवर तो कामाला यायचा. परंतु बुधवारपासून तो बेपत्ता होता, अशी माहिती मिळाली. मृतदेह ज्ञानेश्वरचा असल्याची खात्री पटली. तेजाब जोरसिंग राठोडच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.

लवकर उलगडा ^घटनेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताची ओळख पटली असल्यामुळे मारेकऱ्यांपर्यंत पोहचणे कठीण होणार नाही. मृत तरुण बेपत्ता होता. या प्रकरणी काही जणांकडे चौकशी सुरू आहे. दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक, धुळे गवत अन खूनाचा योग २ मे रोजी महिंदळे शिवारात मृतदेह आढळला होता. झुडपांना लागलेल्या आगीमुळे मृतदेह मिळाला होता. परंतु त्याची ओळख अद्याप पटली नाही. दोन्ही घटनांत तारीख, घटनाक्रम व आगीची घटनेचा दुदैवी योगायोग आहे.

बातम्या आणखी आहेत...