आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूची नोंद:गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; सुमारे सहा महिन्यांपूर्वी झाला होता अपघात

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुने धुळे परिसरातील भोई गल्लीत राहणाऱ्या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. राजेंद्र फुलपगारे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

जुने धुळ्यातील भोई गल्लीत राहणारे राजेंद्र सुकलाल फुलपगारे (वय ५६) यांचे मातीचे जुने घर आहे. घराच्या छतावर लाकडी पाट्या ठोकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे राजेंद्र फुलपगारे रात्री देखरेखसाठी घरात झोपण्यास गेले होते. सकाळी ते परत आले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा आकाश जुन्या घरी आला. त्यावेळी राजेंद्र फुलपगारे गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. फुलपगारे कुटुंबीय व शेजाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृत राजेंद्र फुलपगारे यांचा सुमारे सहा महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत होऊन चालण्यास त्रास व्हायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी मृत राजेंद्र यांचा मुलगा पंकज फुलपगारे (वय ३७) याच्या माहितीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस कर्मचारी अविनाश वाघ तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...