आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधू-वर‎ परिचय मेळावा:माळी समाजाचा वधू-वर‎ परिचय मेळावा आता‎ होणार 19 फेब्रुवारीला‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश माळी महासंघातर्फे‎ माळी समाजातील सर्व पोट‎ शाखेतील वधूवरांचा राज्यस्तरीय‎ वधूवर परिचय मेळावा १९‎ फेब्रुवारीला होणार आहे. हा मेळावा‎ छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात‎ हाेईल. माजी आमदार सदाशिव‎ माळी यांच्या निधनामुळे‎ मेळाव्याच्या तारखेत बदल करण्यात‎ आला.

मेळाव्यात सहभागी‎ होण्यासाठी ज्यांनी अद्याप नोंदणी‎ केली नसेल त्यांनी समाजाच्या‎ संपर्क कार्यालयात दत्त मंदिर चौक,‎ हॉटेल पंकज शेजारी देवपूर येथे १२‎ फेब्रुवारीपर्यंत नावे नोंदवावी, असे‎ आवाहन आयोजन समितीचे प्रा.‎ बी. बी. महाजन, प्रा. एस. टी.‎ चौधरी, प्रा. बी. एच. जाधव, प्रा.‎ अनिलकुमार बोरसे, प्रा. पाटील, प्रा.‎ आर. आर. वाघ, लक्ष्मण बागुल,‎ कैलास पाटील, एकनाथ माळी, बापू‎ माळी, सुमीत चौधरी, हर्षल महाजन‎ आदींनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...