आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळे:तब्बल १० वर्षांनी झाली भावाची बहिणीशी भेट, पत्रकारितेतून जपली गेली सामाजिक बांधिलकी

पिंपळनेरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • एका व्हिडीओ मुळे कळाले ठिकाण....

विशाल बेनुस्कर

साक्री तालुक्यातील निजामपुर येथील महिला रंजना दत्तात्रेय चिंचोले या तब्बल १० वर्षांपासून घराबाहेर भटकंती करत होत्या. १० एप्रिल रोजी रंजना चिंचोले यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर फिरत होता. तो व्हिडीओ येथील प्रतीक कोतकर यांनी अक्षय कोठावदे यांना पाठवला अक्षय कोठावदे यांनी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक वाणी व निजामपुर येथील राजेंद्र राणे यांना पाठवला संबंधित व्हिडिओची शहानिशा केली असता तो  भुसावळ येथील असल्याचे समजले. १० एप्रिल रोजी सायंकाळी रंजना चिंचोले यांच्या भावाने भुसावळ येथील रेल्वे पोलिस स्टेशन आणि बाजारपेठ पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.या घटनेच्या पार्श्वभूमिवर भुसावळ येथील स्थानिक पत्रकारांनी त्या महिलेची विचारपुस केली व पोलिस यंत्रनेला माहिती दिली.१२ एप्रिलला रंजना चिंचोले या भुसावळ येथील बाजारपेठ पोलिसांना रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळुन आल्या,त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी रंजना चिंचोले यांच्या भावाला ही माहिती दिली व आपली बहिन येथे सुखरूप असल्याचे सांगितले. व येथे येऊन त्यांना घरी घेऊन जाण्याची विनंती केली. अवघ्या २ दिवसांच्या पाठपुराव्या नंतर रंजना चिंचोले व  बंधु राम चिंचोले यांची तब्बल १० वर्षानंतर अविस्मरणीय भेट सोशल मीडिया पत्रकारांच्या एका सकारात्मक पावलामुळे एका बहिणीला आपल्या भावाची भेट झाल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.

लग्नही जमत नव्हते म्हणुन ठेवले होते केंद्रात..

रंजना दत्तात्रय चिंचोले यांचे लग्न होत नव्हते म्हणून तिला पिंपळनेर जवळील मानव  केंद्रात सुपुर्द केले होते.तेथे एका स्वयंपाक करणाऱ्या ईसमाबरोबर तिचे लग्न करण्यात आले. तिला दोन मुली झाल्या.दुर्दैवाने तिचे पती सुद्धा स्वर्गवासी झालेले आहेत. आणी आज रजूताईचा सांभाळ कोणी करावा म्हणून मोठा प्रश्न उभा राहिला होता. अनेकांनी तिच्या भावांशी  संपर्क साधला व  ती कुठेच राहत नसून मुलींकडे सूध्दा राहत नाही.त्यामुळे अनेकांनी वृद्धाश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला होता.

परवा १० एप्रिल,२०२० निजामपुर येथील एका महिलेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता,तो व्हीडिओ भुसावळ येथील होता.अक्षय कोठावदे यांनी सर्वप्रथम याची माहिती काही समाजबांधव व  पत्रकारांमार्फत त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवली, त्यांच्या नातेवाइकांनी भुसावळ येथील पोलीस स्टेशन येथे संपर्क केला असता ती महिला रेल्वे स्टेशनच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार त्या महिलेचे नातेवाईक तिला पोलीस यंत्रणेच्या मदतीने घेण्यासाठी सोमवारी भुसावळ येथे आले असून तिला घरी आणल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

दरम्यान भाऊ राम याला बघताच रंजनाचे अश्रु अनावर झाले.त्यांनी भावाची गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला व  इतक्या दिवसांपासून त्या ज्या ठिकाणी राहत होत्या त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना त्या आनंदाने भाऊ आल्याची माहिती देत होत्या. 'सर्वत्र लॉकडाऊन असल्याने वृत्तांकलन करण्याऱ्या स्थानिक प्रतिनिधींना रंजना चिंचोले निदर्शनास आल्या त्यांनी लॉकडाऊनमध्ये होणाऱ्या हालअपेष्टामुळे घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार सर्व प्रतिनिधिंनी व्हायरल केलेल्या व्हिडिओ मुळे नातेवाईक त्या महिलेपर्यंत भुसावळ मध्ये पोहोचले व सोमवारी निजामपूर ता.साक्री येथे आणले.'

बातम्या आणखी आहेत...