आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेतली आहे. या विरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष बुधवारी आंदोलनातून दिसून आला. शिवसैनिकांनी जुन्या महापालिकेसमोर ईडीसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करत, रस्त्यावर टरबूज फोडत निषेध नोंदवला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महानगर आणि जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून जुन्या महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करत लक्ष वेधून घेतले. जोरदार घोषणाबाजी करत निघालेला मोर्चा जुन्या महापालिका चौकात पोहोचला. या ठिकाणी ईडीसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला.
या आंदोलनात सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्त्री, अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, धीरज पाटील, संघटक डॉ. सुशील महाजन, गुलाब माळी, राजेश पटवारी, संजय गुजराथी, प्रफुल्ल पाटील, भरत मोरे, भटू गवळी, संजय वाल्हे, प्रवीण साळवे, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, पंकज भारस्कर, नंदलाल फुलपगारे, मच्छिंद्र निकम, बबन थोरात, विकास शिंगाडे, डॉ. भरत राजपूत, देवा लोणारी, नितीन शिरसाट, अमित शार्दुल, अरुणा मोरे, संगीता जोशी, सुनीता वाघ, पवन शिंदे, आबा हरळ, सचिन बडगुजर, संजय जगताप, प्यारेलाल मोरे, पिनू सूर्यवंशी, मुकेश भोकरे, मुरलीधर जाधव, सुनील पाटील, भय्या बागुल, केशव माळी, रवींद्र माळी, शुभम मतकर, संदीप चौधरी, नितीन जगताप, रवी पाटील, प्रकाश शिंदे, कैलास मराठे, जुनेद शेख, संजय देवरे, शेखर बडगुजर, नीलेश मराठे, प्रवीण साळवे, प्रकाश शिंदे, शुभम पाटील, सतीश गिरमकर, सनी मोरे, अजित बागुल, लकी पाटील, सुयोग मोरे, अरुण लष्कर, मनोज शिंदे, सागर निकम, पंकज चौधरी, मोहंमद शेख, अक्षय पाटील, अमोल ठाकूर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले.
चौकात टरबुजांचा पडला सडा
शिवसैनिकांनी माजी मुख्यमंत्र्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या वेळी रस्त्यावर टरबूज आपटत ते फोडले. या वेळी मोठ्या प्रमाणात टरबूज फोडल्याने रस्त्यावर अक्षरश: फुटलेल्या टरबुजांचा सडा पडला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.