आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप‎:वृक्षारोपण करून‎ शिबिराचा समारोप‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती‎ विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय‎ सेवा योजना एककाचे विशेष‎ श्रमसंस्कार शिबिर जिल्हा परिषद‎ शाळा निमडाळे येथे पार पडले.‎ समरोपाच्या दिवशी वृक्षारोपण‎ करण्यात आले.‎ शिबिराचे उद्घाटन कर्नल उत्तमराव‎ पाटील याच्यां हस्ते करण्यात आले.‎ प्रमुख पाहुणे प्राचार्य शिवाजीराव‎ पाटील, सरपंच सुधाकर सैंदाणे,‎ उपसरपंच प्रतिभाताई पाटील,‎ पंचायत समिती सदस्य अमृत वाघ,‎ पोलिस पाटील पुंडलिक पाटील‎ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका‎ कल्पनाताई देवरे उपस्थित होते.‎ समारोप प्रसंगी कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी वेस्ट खान्देश दलित‎ शिक्षण प्रसारक मंडळाच्या‎ संचालिका नालंदा निळे, विधिशा‎ निळे उपस्थित होते.

शिबिरात‎ समाज माध्यमे आणि युवक, स्वामी‎ विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान,‎ अंधश्रद्धा निर्मूलन, शासनाच्या‎ विविध योजना, बेटी बढाव बेटी‎ पढाव, ज्येष्ठ नागरिक अधिनियम‎ २००७, प्रदूषण थांबवा देश वाचवा,‎ न्यायदंडाधिकारी व सरकारी‎ अभियोक्ता स्पर्धा परीक्षा तयारी,‎ व्यक्तिमत्त्व विकास आणि संभाषण‎ कौशल्य अशा विविध विषयांवर‎ बौद्धिक सत्र झाले. या वेळी रूपाली‎ जाधव हिने मनोगत बंजारा भाषेमध्ये‎ तर नकुल पाटील यांनी अहिराणी‎ मध्ये आपले व्यक्त केले.

समारोप‎ प्रसंगी शाळेच्या प्रांगणामध्ये नालंदा‎ निळे व मुख्याध्यापिका कल्पनाताई‎ देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.‎ शिबिरासाठी प्राचार्य डॉ. विजय‎ बहिरम, उप प्राचार्य डॉ. साजिदा‎ शेख, कार्यक्रम अधिकारी डॉ.‎ राजेश मकासरे, डॉ. साजेदा शेख,‎ प्रा. दगा पाटील, भूषण पाटील,‎ विकी साळवे, आशिष पाटील,‎ सचिन कुलकर्णी, जमुना वाघ,‎ नजमा बानो यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...