आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बालकाचा जीव घेणारी कार जप्त

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री रोडवर निशिध सोनवणे या बालकाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेली कार पोलिसांनी पहाटे जप्त केली. चालकाला ताब्यात घेतले. जयेश सैंदाणे त्याचे नाव आहे. कारविषयी पोलिसांनी पत्र दिल्यावरही आरटीओ विभागाने सहकार्य केले नाही. त्यामुळे पोलिसांना कार शोधताना त्रास झाला.साक्री रस्त्यावर भरधाव वेगातील कारने (एमएच-०४-एचएफ-४९२१) दुचाकीला धडक दिली होती.

या अपघातात दुचाकीवरील निशिध लीलाधर सोनवणे (वय ८, रा. संबोधी नगर, साक्रीरोड) याचा मृत्यू झाला. त्यानंतर कार चालक पसार झाला होता. कार मालकाचा पत्ता व इतर माहितीसाठी शहर पाेलिसांनी आरटीओ विभागाला पत्र दिले. पण आरटीओ विभागाने पोलिसांना सहकार्य केले नाही. चौकशीअंती ही कार देवपुरातील जयेश सैंदाणे याची असल्याचे समोर आले. पण जयेश कारसह पसार होता. तो घरी आल्याची माहिती हवालदार विजय शिरसाठ यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पहाटे साडेचार वाजताच जयेश व कारला ताब्यात घेतली.

कारवाई होणे आवश्यक
गुन्ह्याचा छडा लागावा, चालकाचे नाव समोर यावे यासाठी पोलिसांनी आरटीओ विभागाला कारची माहिती द्यावी, यासाठी पत्र दिले होते. पण आरटीओ विभागाने सहकार्य केले नाही. त्यामुळे या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त होते आहे.

बातम्या आणखी आहेत...