आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजेरी:स्वच्छता कर्मचाऱ्यांची हजेरी घेणार लिपिक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी नियुक्त केलेल्या भागात उशिराने येतात, त्यातही काही कर्मचारी प्रत्यक्ष कामांवर न येता केवळ हजेरी लावतात, असा आरोप स्थायी समिती सभेत माजी सभापती संजय जाधव यांनी केला आहे. आता चालू महिन्यापासून सफाई कामगारांची त्यांच्या भागात जाऊन जागेवर स्वच्छता निरीक्षकांऐवजी कारकून हजेरी घेणार आहे.

शहरात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात येते. अनेक कर्मचारी प्रत्यक्ष कामावर न येता हजेरी लावतात. स्वच्छता निरीक्षक त्या बदल्यात पैसे घेतात असा आरोप माजी स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी सभेत केला. त्यामुळे आता स्वच्छता निरीक्षक हजेरी न घेता कारकून घेतील. त्यासाठी १९ प्रभागासाठी १४ कारकून नेमले.

बातम्या आणखी आहेत...