आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळी:कोरोना सावटानंतर आज काठीच्या होळीत भरणार आदिवासी संस्कृतीचे रंग

अक्कलकुवा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजवळी होळीला सुमारे 775 वर्षांची परंपरा; 70 फूट पेक्षाही अधिक लांबीचा दांडा, विधिवत होणार पूजन

कोरोनाच्या दोन ‌वर्षे निरुत्साही वातावरणांतर पुन्हा सातपुड्यातील राजेशाही संस्थानची ओळख असलेली अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील राजवळी होळी दि.१७ मार्च रोजी उत्साहात साजरी होणार आहे.

या राजवळी होळीला सुमारे ७७५ वर्षांची परंपरा असून, ग्रामस्थ व संस्थानच्या वारसदारांनी ही परंपरा टिकवून ठेवली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे होळी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने या होळीच्या उत्सवामुळे सातपुडावासीयांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

काठी येथे होळी उत्सव साजरा करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. काठी संस्थानचे वारसदार पृथ्वीसिंग पाडवी, महेंद्रसिंग पाडवी व ग्रामस्थ हे अविरतपणे ही परंपरा जोपासत आहेत. भाविकांसाठी जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी व काठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा पाडवी यांनी भाविकांसाठी भव्य मंडप, जनरेटर, एलईडी टीव्ही यांची सोय केली आहे. राजापांठा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाडवी, सागर पाडवी, शेरसिंग पाडवी, काथू पाडवी, विजय पाडवी, बहादूरसिंग पाडवी, गणपत पाडवी आदी परिश्रम घेत आहेत. पालकमंत्री के.सी.पाडवी, जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहा. जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, आदिवासी एकता परिषदेचे अशोक चौधरी, जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, तसेच गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्यातील आदिवासी संस्कृतीचे अभ्यासकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

होळीच्या दांडाची साडेसातशे वर्षांची परंपरा : होळीसाठी लागणारा सुमारे ७० फूट पेक्षाही अधिक लांबीचा दांडा (बांबू) भाविक ग्रामस्थ गुजरात राज्यातून पायपीट करीत आणत आहेत. दांडा आणण्याचा हा प्रवास अविरतपणे सुरू आहे. याला सुमारे साडेसातशे वर्षांची परंपरा आहे. अनादी काळात आदिवासी बांधवांचे कुलदैवत राजापांठा व गांडा ठाकूर यांनी एकत्र येत या उत्सवाला प्रारंभ केल्याचे सांगितले जाते. सुमारे १२४६ या सालापासून काठी संस्थानचे पहिले राजे उमेदसिंह सरकार यांनी या होलिकोत्सवाला राजवळी होलिकोत्सव म्हणून प्रारंभ केला ती परंपरा आजही जोपासली आहे.

नवसपूर्ती, नृत्यानंतर पहाटे ५ वाजता होईल होळी प्रज्वलित
७० फूट पेक्षाही जास्त लांबीचा दांडा, भाविक गुजरात राज्यातून होळीच्या दिवशी आणल्यानंतर सर्व प्रथम राजघराण्यातील सदस्य त्याची विधिवत पूजाअर्चा करतात. हा पवित्र दांडा गाडला जातो. त्याला नैवेद्य दाखवले जाते. नंतर भाविक ढोल ताशांच्या गजरात रात्रभर धुंद होऊन नाचत असतात. पहाटे सुमारे ५ वाजेच्या दरम्यान होळी मातेला प्रज्वलित केले जाते. होळी मातेने पेट घेताच मोरवी बाबा बुध्या, ढानका दोडे हे सर्वजण राम ढोलच्या तालावर फेर धरता.

होळी सणातून आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाचा प्रयत्न
सन १२४६ पासून अविरतपणे सुरू असलेला होळी हा सातपुड्यातील आदिवासी बांधवांचा प्रमुख सण आहे. आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. होळी माता मानव जातीवर येणारे प्रत्येक संकट दूर करेल, या प्रार्थनेने होळी सण साजरा करू या. पृथ्वीसिंग पाडवी, काठी राजघराण्याचे वारसदार

बातम्या आणखी आहेत...