आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुलीची‎ अट:वेतनवाढीसाठी असलेली वसुलीची‎ अट चुकीची; निदान किमान वेतन द्यावे‎

धुळे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे‎ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध‎ मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित‎ आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गुरुवारी शहरातील कल्याण भवनाच्या बाहेर निदर्शने केली. शासनाने तातडीने लागू केलेली सुधारित वेतनवाढ लागू‎ करावी, वेतनवाढीसाठी असलेली वसुलीची अट चुकीची असून, ती रद्द‎ करावी, अशी मागणी करण्यात आली.‎ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दर पाच‎ वर्षांसाठी ऊर्जा व कामगार विभागातर्फे‎ किमान वेतन पुनर्निर्धारित करण्यात‎ येते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ३०‎ ऑक्टोबर २०१३ रोजी वेतनवाढ लागू‎ झाली.

त्यानंतर सन २०१८ मध्ये‎ वेतनवाढ होणे आवश्यक होते. पण‎ त्याकडे शासनाने लक्ष दिले नाही.‎ तसेच वेतनवाढीसाठी कर वसुलीची‎ अट टाकण्यात आली. वसुलीची अट‎ रद्द करून वेतनवाढ लागू करावी या‎ मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी‎ सातत्याने आंदोलन केले. पण उपयोग‎ झालेला नाही. ग्रामपंचायत‎ ‎कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ लागू‎ करावी, यावलकर समितीच्या‎ शिफारशींची अंमलबजावणी करण्यात‎ यावी यासाठी मोर्चा काढण्यात आला.‎

या आंदोलनाची दखल घेत ग्रामविकास‎ मंत्रालयाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना‎ किमान वेतन लागू केले. त्यानुसार‎ कुशल कर्मचाऱ्यांना १४ हजार १२५,‎ अर्धकुशल कर्मचाऱ्यांना १३ हजार‎ ४२० तर अकुशल कामगारांना १३‎ हजार ८५ रुपये असे वेतन लागू केले‎ आहे. या निर्णयानुसार वेतन देण्यात‎ यावे, अशी मागणी करण्यात आली.‎ आंदोलनात वसंतराव पाटील, अॅड.‎ मदन परदेशी, सुरेश माळी, हिलाल‎ वाघ, लोटन सोनवणे, सुकदेव वाघ,‎ शांतिलाल पाटील, कृष्णकांत कपाटे,‎ निंबा पावरा, चंद्रकांत पाटील, किशोर‎ भदाणे, अजित देवरे, मुकेश माळी,‎ संजय नवसारे, भरत नवसारे, किरण‎ मालचे, वसंत पाटील, आनंदा पवार,‎ सखाराम पाटील, समाधान वाघ, संजय‎ पाटील, वना पाटील, मनोहर पाटील,‎ दशरथ भील, के. डी. पावरा, कैलास‎ पावरा, राहुल कोकणी, दिनकर‎ चौधरी, दशरथ करनकाळ, रवी बंजारा‎ आदी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...