आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉग:ठेकेदारच पकडेल कुत्रे, डॉग व्हॅन खरेदी थांबवली

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण होणार आहे. या कामाचा ठेका दिला जाणार असून, त्यासाठी निविदा प्रसिध्द झाली आहे. ठेकेदारच कुत्र्यांना पकडणार आहे. त्यामुळे महापालिकेने डॉग व्हॅन घेण्याची प्रक्रिया थांबवली आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्त्यावरील दुभाजकावर रात्रभर कुत्रे बसलेले असतात. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पाठीमागे लागून ते चावा घेतात. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. महापालिकेच्या दवाखान्यात रोज चार ते जण अॅण्टी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत होत होती. त्यामुळे महापालिकेने डॉग व्हॅन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

तसेच कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ठेकेदार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. ठेकेदारच मोकाट कुत्रे पकडेल. शस्त्रक्रियागृह उभारण्यासाठी महापालिका ठेकेदाराला जागा देणार आहे. तीन वर्षासाठी ठेका दिला जाणार आहे. ठेकेदारालाच मोकाट कुत्रे पकडण्यासाठी डॉग व्हॅन उपलब्ध करून द्यावी लागणार आहे

बातम्या आणखी आहेत...