आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावावर दु:खाचा डोंगर कोसळला:शहीद जवानाचे पत्नीशी एक दिवसापूर्वीचे बोलणे ठरले अखेरचे

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैन्य दलाच्या ५६ राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये असलेले धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील जवान मनोज लक्ष्मण गायकवाड हे जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर हाेते. हिमस्खलनामुळे ते बर्फाखाली दाबले गेल्याने शहीद झाले. त्यांचे १७ नोव्हेंबरला पत्नीशी मोबाइलवर अखेरचे बोलणे झाले होते. त्यानंतर शुक्रवारी धटना घडली व शनिवारी मनोज गायकवाड शहीद झाल्याचे समजले. घटनेमुळे कुटुंबासह गावावर दु:खाचा डोंगर कोसळला.

तालुक्यातील चिंचखेडा येथील मुकेश लक्ष्मण गायकवाड (वय ४१) हे २१ वर्षांपासून ५६ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. ते जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछील परिसरात १८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता पेट्रोलिंगसाठी गेले होते. त्या वेळी हिमस्खलन झाले. त्यामुळे गायकवाड यांच्यासह तीन जवान बर्फाखाली अडकले. त्यांना उपचारासाठी सैन्याच्या रुग्णालयात नेले.

पण उपचार सुरू करण्यापूर्वी गायकवाड यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या मृत्यूची माहिती आधी जवळच्या नातलगांना कळवण्यात आली. शहीद जवान गायकवाड यांची आई, वडील, पत्नी, मुलांना याविषयी सुरुवातीला माहिती नव्हती. त्यांना शनिवारी ही घटना सागितली. त्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. शहीद जवान गायकवाड यांचा मृतदेह उद्या रविवारी सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. गायकवाड कुटुंबाची सावळी रस्त्याला शेती असून या ठिकाणी अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले, दोन भाऊ आहे.

मुलांसाठी वाढवली ५ वर्षे सेवा
मुकेश गायकवाड हे सन २००२ मध्ये सैन्य दलात भरती झाले. तीन वर्षांपूर्वी त्यांचा करार पूर्ण झाला हाेता. मुले लहान असल्याने त्यांचे शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी पाच वर्षांसाठी सेवा वाढवली. त्यांना नायक म्हणून पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांची जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्ती होती. दोन वर्षांनंतर ते निवृत्त हाेणार होते.

रोज करायचे व्हिडिओ कॉल
मनोज गायकवाड रोज पत्नी, मुलांसह आई-वडिलांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत होते. त्यांनी १७ नोव्हेंबरला पत्नीच्या मोबाइलवर दुपारी साडेचार वाजता फोन केला होता. त्या वेळी सर्वांशी चर्चा केली. पत्नीसह आई, वडील भावंडांनी १७ आणि १८ नोव्हेंबरला त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण झाला नाही.

दिवाळीपूर्वीच आले होते घरी : मुकेश गायकवाड यांचे वडील लक्ष्मण गायकवाड चिंचखेडाचे उपसरपंच होते. शहीद गायकवाड यांचे वडील आणि लहान भाऊ शेती करतात. मोठा भाऊ पुणे येथे आहे. तसेच मुलगी केंद्रीय विद्यालयात नववीत तर मुलगा तिसरीत आहे. गेेल्या वर्षीच शहरातील ओसवाल नगरात त्यांनी घर घेतले होते. दिवाळी पूर्वी ते सुटीवर आले होते. महिनाभरापूर्वी सुटी संपवून कर्तव्यावर हजर झाले होते.

बातम्या आणखी आहेत...