आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग शहरातील कलावंत राजेश वैद्य यांनी लाकडावर कोरीव काम करून साकारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ते या कामात गुंतले आहे. सद्य:स्थितीत रंगकाम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राजेश वैद्य ३ बाय ६ फूट आकाराच्या एमडीएफ लाकडी शीटवर शिवराज्याभिषेकाचा प्रसंग साकारला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक नेत्रदीपक सोहळा आजही तमाम महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे. शिवराज्याभिषेकाचे अनेक पेंटिंग अनेक चित्रकारांनी साकारले आहे. पण पेंटिंगच्या पलीकडे जाऊन काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने शहरातील कलावंत राजेश वैद्य यांनी ३६ एमएम एमडीएफ लाकडी फ्रेमवर शिवराज्याभिषेकाचा प्रसंग साकारण्याचा निर्णय घेतला. पण ३६ एमएमएचे एमडीएफ शीट उपलब्ध नसल्याने त्यांनी १८ एमएमचे दोन शिट एकत्र केले. त्यानंतर ३६ एमएमच्या शीटवर २७ एमएमपर्यंत कोरीव काम केले. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, मावळे आदींचा समावेश आहे. शिवराज्याभिषेकाचा प्रसंग तयार करण्यासाठी राजेश वैद्य यांना एक महिना लागला. गेल्या आठ दिवसांपासून रंगकाम सुरू झाले आहे. रंगकाम झाल्यावर त्यावर प्लास्टिक कोटिंग करण्यात येईल. ही फ्रेम साकारताना त्यात जिवंतपणा यावा यासाठी थ्रीडी इफेक्ट देण्याचा प्रयत्न वैद्य यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.