आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:घरफोडीचा गुन्हा उघडकीस

धुळे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मालेगाव रोडवर झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची शहर पोलिसांनी उकल केली. या प्रकरणी संशयिताकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. मालेगाव रोडवरील शनी मंदिराजवळ राहणारे दिनेश भटूलाल शर्मा यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६१ हजारांची रोकड लांबवली होती. पोलिसांनी चोवीस तासात ऋतिक उर्फ निक्की अमरजितसिंग पंजाबीला अटक केली.

त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून ३५ हजारांची रोकड जप्त केली. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, कर्मचारी भिकाजी पाटील, दिनेश परदेशी, प्रल्हाद वाघ, कुंदन पटाईत, गौरव देवरे, नीलेश पोतदार, मनीष साेनगीरे, प्रवीण पाटील, तुषार मोरे, अविनाश कराड, प्रसाद वाघ, गुणवंतराव पाटील, किरण भदाणे, शाहीद शेख यांनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...