आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:हातोडा पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे

तळोदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातोडा पाणीपुरवठा योजनेसंदर्भात नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी दोंडाईचा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. दरम्यान आमदार राजेश पाडवी व परदेशी यांना मुंबईला चर्चेसाठी बोलावले आहे.

हातोडा पाणीपुरवठा योजना ही मागील बारा वर्षांपासून रखडली असून, शुद्ध पाणीपुरवठा मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक वाट पाहत आहेत. तळोदा शहराकरिता सन २०५१ पर्यंतची लोकसंख्या व विस्तारीकरण व इतर गोष्टी गृहीत धरून एकूण २:५७ दलघमी पाणी आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. उपाय करण्याच्या नियंत्रण पातळी ८२.३१७ एवढे आहे.

सामान्य सहकारानुसार पाणी वरून उचलण्याबाबतचे ताक तसेच तथापि सदर पाणीपुरवठा योजनाही १९८२ पासून कार्यरत आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी वाढीव निधीसाठी नगराध्यक्ष अजय परदेशी, डॉ. शशिकांत वाणी, रूपसिंग बिरबा पाडवी, राजेंद्र राजपूत यांनी निवेदन दिले. अजय परदेशी यांनी सांगितले की हातोडा पाणीपुरवठा योजना संदर्भात आमदार राजेश पाडवी तसेच गुजरातचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, याबाबत गुजरातच्या प्रमुख लोकप्रतिनिधींना भेटून याबाबत निवेदन दिले असून, चर्चादेखील झाली आहे.

मात्र सदर विषय हा केंद्र सरकारच्या अख्त्यारीत असल्याकारणाने याबाबत वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे अपेक्षित आहेत. त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. या निधीसाठी उपमुख्यमंत्री फडवणीस यांची भेट घेतली असून, त्यांनी मंगळवारी मुंबईला या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे, असे परदेशी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...