आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी संसार:सुखी संसाराचे स्वप्न भंगले; आक्रोशाने पाणावले डोळे ; मुक्ताईनगरजवळ शहरातील ४ ठार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर जवळ झालेल्या अपघाताची माहिती मिळाल्यावर मृत चौघांच्या घरी एकाच आक्रोश सुरू होता. अपघातात मृत धनराज पाटील व भालचंद्र पाटील हे एकुलते एक होते. भालचंद्र पाटील याचा तीन महिन्यापूर्वी विवाह झाला होता. तसेच पवन चौधरी लग्नासाठी लवकरच सुट्टीवर जाणार होता. लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.

मुक्ताईनगर जवळील घोडसगाव येथे दुधाचा टँकर रिकामा करताना भरधाव वेगातील वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात धुळे तालुक्यातील नगाव येथील धनराज पाटील व भालचंद्र गुलाब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती मागे राहणारा पवन सुदाम चौधरी व देवपूरातील उमेश राजेंद्र सोलंकी ठार झाले. मृतांमधील भालचंद्र पाटीलचा तीन महिन्यापूर्वी विवाह झाला होता. सुखी संसार फुलण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घातला. पवन चौधरीचा २२ मे रोजी विवाह होता. लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासह नियोजनासाठी तो सुट्टीवर जाणार होता. निदान लग्नासाठी तरी सुट्टी घे असा तगादा कुटुंबियांनी त्याच्याकडे लावला होता. पवनने लग्नाची तारीख जवळ आल्यावर सुट्टी घेतो असे सांगितले होते. धनराज पाटील व भालचंद्र पाटील हे मित्र होते. दोघेही कुटुंबात एकुलते एक होते. उमेश सोलंकी विवाहीत होता. देवपूरातील बोरसे नगरात तो राहत होता. त्याचा मोठा भाऊ छायाचित्रकार आहे.

बातम्या आणखी आहेत...