आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी रात्री मुक्कामी थांबलेल्या पुणे-धुळे बसच्या चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. चालक नाशिक येथील रहिवासी असून ते दीड वर्षानंतर सेवानिवृत्त होणार होते. हिरामण नाना देवरे (५६, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक) असे या मृत चालकाचे नाव आहे. तर त्यांच्या बसचे वाहक महेश सुभाष पाथरूडकर (४५, रा. सुभद्रा संमत अपार्टमेंट, माणिक बाग, पुणे) हे आहेत. धुळे-पुणे बस (एमएच ०६ एस ८९२१) शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता धुळे आगारात मुक्कामी आली. ही बस पार्किंगच्या ठिकाणी लावून देवरे व पाथरूडकर बाहेर पडले. त्यानंतर देवरे यांनी जेवणासाठी नकार दिला. त्यामुळे पाथरूडकर इतरांसोबत जेवणाला गेले. त्यानंतर देवरे यांच्याशी त्यांनी मोबाइलवरही संपर्क केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचा शोध घेत पाथरूडकर व इतर कर्मचारी पार्किंगजवळ आले. तेथे बसचा दरवाजा उघडा दिसला. आत बसच्या छताला लावलेल्या सुरक्षा रडला बेलच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत देवरे आढळले. रुग्णालयात नेले असता डॉ. अरुण नागे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.