आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ निवडणूक:काेषागार कर्मचारी पतपेढीची‎ निवडणूक झाली बिनविराेध‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे व नंदुरबार जिल्हा काेषागार‎ कर्मचारी सहकारी पतपेढीची सन‎ २०२२-२३ व २०२७-२८ या‎ काळासाठी व्यवस्थापन समितीची‎ निवडणूक पार पडली. ही निवडणूक‎ बिनविराेध झाली. निवडणूक निर्णय‎ अधिकारी म्हणून याेगेश पाटील‎ यांनी काम पाहिले. यासाठी अर्ज‎ दाखल दाखल करण्याच्या शेवटच्या‎ दिवशी इतर उमेदवारांनी माघार‎ घेतल्याने पतपेढीची निवडणूक‎ बिनविराेध झाली.

त्यात सर्वसाधारण‎ गटातून विश्वास रामदास चाैधरी,‎ अतुल भटू ठाकूर, मिलिंद वसंत‎ देव, उदय पद्माकर पाठक, शेख‎ माेहंमद रफिक, भूषण शांताराम‎ सूर्यवंशी हे बिनविराेध निवडून‎ आले. तर अनुसूचित जाती,‎ जमातीच्या जागेवर महेंद्र चंद्रसिंग‎ खैरनार, महिला राखीव जागेवर‎ वंदना तुकाराम ठाकरे, पल्लवी‎ मकनराव साबळे, इतर मागासवर्गीय‎ जागेवर उल्हास सुदाम धाकड,‎ तसेच भटक्या विमुक्त जाती,‎ जमाती व विशेष मागास प्रवर्ग‎ प्रतिनिधी म्हणून शुभम पाराेजी‎ गवळी यांची बिनविराेध निवड‎ करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...