आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या बोरद विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होणार, असे वातावरण निर्माण झाले असताना सोसायटीच्या सभासद मंडळातील ज्येष्ठ सभासदांनी एकत्र येत दत्तात्रय काशिनाथ पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्यात दत्तात्रय पाटील व इतर सभासदांनी शिष्टाई केल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी १३ जागांसाठी १३ उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्याने निवडणूक न होता बिनविरोध निवड झाली. १९५९ पासून आजतागायत सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत होती. ही परंपरा खंडित न होऊ देता सामंजस्याने सर्व जुने उमेदवार वगळून नवीन उमेदवार घेण्याचे ठरले. त्यानुसार १३ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यात सर्वसाधारण मतदार संघातून गणेश चौधरी, जितेंद्र पाटील, अनिल राजपूत, भीमसेन राजपूत, सुनील पाटील, प्रल्हाद पाटील, इप्तीखार तेली, जगदीश चौधरी, ओबीसी प्रतिनिधी योगेश पाटील, एस.टी. देविदास ठाकरे, महिला प्रतिनिधी सुभद्रा पाटील, सरोजबाई पाटील, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मनीलाल ढोडरे यांनी अर्ज दाखल केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.