आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यासह शहरात कानबाई मातेचे रविवारी दुपारी उत्साहात आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी कानबाईला रोटाचा नैवेद्य दाखवण्यात आला. रात्रभर भक्तांनी जागरण केले. त्यापूर्वी सायंकाळी महिलांतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. काेराेनामुळे दाेन वर्षांनी हा उत्सव सार्वजनिक रित्या साजरा झाला. कानबाई मातेच्या उत्सवासाठी नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंबातील सदस्य शनिवारीच आले होते. शहरातील जुने धुळे, मील परिसर, मार्केट भागासह बाळापूर, नकाणे, वलवाडी, वरखेडी आदी भागात उत्साह दिसून आला. कानबाईची रविवारी दुपारी विधीवत स्थापना करण्यता आली. सकाळपासूनच महिलांची लगबग सुरू झाली होती. अनेकांनी आकर्षक आरास व विद्युत रोषणाई केली होती.
जुने धुळे परिसरात सकाळपासूनच ध्वनीक्षेपकांवर कानबाईचे गीते वाजवली जात होती. उत्सवामुळे केळीचे खांब, केळीचे फुल, केवडाचा कंद, फुल, प्रसादासाठी लागणाऱ्या लाह्या, फुटाण्यांना अधिक मागणी होती. त्यामुळे रविवार असूनही बाजारात गर्दी होती. दर्शनासाठी गर्दी कोरोनामुळे दोन वर्ष घरगुती पध्दतीने कानबाई मातेचा उत्सव साजरा झाला. यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने उत्साह दिसून आला. दर्शन व प्रसाद घेण्यासाठी अनेकांनी नातेवाईकांसह मित्रमंडळींना आमंत्रित केले होते. त्यामुळे सायंकाळी विविध भागात गर्दी असल्याचे दिसून आले.
सोमवारी होणार विसर्जन... उत्सवानिमित्त अनेकांनी रविवारी रात्रभर जागरण्यास करण्यास प्राधान्य दिले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कानबाई मातेला उद्या सोमवारी (दि.८) रोजी वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढून निरोप दिला जाईल. पांझरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीवर विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शहरात दुपारी दोन वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू असतील.सोमवारी होणार विसर्जन... उत्सवानिमित्त अनेकांनी रविवारी रात्रभर जागरण्यास करण्यास प्राधान्य दिले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कानबाई मातेला उद्या सोमवारी (दि.८) रोजी वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढून निरोप दिला जाईल. पांझरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीवर विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शहरात दुपारी दोन वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.