आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:निमगुळच्या शेतकऱ्यांनी‎ पंतप्रधानांना पाठवले पत्र‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निमगुळ येथील‎ शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी‎ यांना पत्र पाठवून कापसाला योग्य‎ भाव द्यावा, अशी मागणी केली.‎ पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना‎ पाठवणयात आलेल्या पत्रात म्हटले‎ आहे की, कापूस पिकवण्यासाठी‎ मोठ्या प्रमाणात खर्च येतो. तसेच‎ इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या‎ दरात वाढ झाली आहे. कपाशीला‎ चांगला भाव मिळत नसल्याने‎ अनेक शेतकरी कापूस घरात ठेवता‎ आहे.

शेतकऱ्यांवर कमी भावात‎ कपाशीची विक्री करण्याची वेळ‎ आली आहे. कपाशीला चांगला‎ भाव मिळावा यासाठी शासनाने‎ प्रयत्न करावे, अशी मागणी‎ शांताराम पाटील, विजय मोरे,‎ दत्तात्रय बोरसे, प्रवीण सोनवणे,‎ जयवंत पाटील, तुकाराम पाटील,‎ महेश सूर्यवंशी, अनिल ठाकरे,‎ आकाश देवरे आदींनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...