आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान:पवित्र रमजान महिन्याला आजपासून होईल प्रारंभ; दोन वर्षांनी मशिदीत होईल नमाज पठण, सुकामेवा, खजूर विक्रीचे दुकानेही सज्ज

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला रविवारपासून सुरुवात होत आहे. रमजान महिन्यात कडक उपवास करण्यात येतात. त्याचप्रमाणे पूर्ण महिनाभर धार्मिक कामात जास्तीत जास्त वेळ देण्यात येतो. कोरोना संसर्गाच्या दोन वर्षाच्या कालावधीत मंदिर, मशीद बंद होते. तर आता दोन वर्षांनंतर सर्व निर्बंध हटवल्यानंतर रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मशिदीत नमाज पठण करू शकणार आहे.

हिंदू बांधवांचा शनिवारी गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला. मराठी नववर्षाची सुरुवात या सणापासून होते. तर शनिवारपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्यास सुरुवात होत आहे. रमजान महिन्यात महिनाभर उपवास करण्यात येतात.

बाजारपेठही खुली असल्याने नागरिक मोकळेपणाने खरेदी करू शकणार आहे. याकरिता यावेळी रमजान महिन्यात उत्साहाचे वातावरण आहे. रमजान महिन्यासाठी बाजारपेठही सज्ज झाली आहे. मुस्लिमबहुल भागात फळ बाजार, सुकामेवा, खजूर विक्रीचे दुकानेही सज्ज आहे. तसेच अत्तर, धार्मिक साहित्याचीही यादिवसात विक्री होते. रमजानच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाबांधवांतर्फे आवश्यक तयारी करण्यात आली आहे. रमजानमध्ये फळांची मागणी वाढत असल्याने फळ विक्रेत्यांनी जास्त फळ मागवली आहेत.

बातम्या आणखी आहेत...