आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:गायरान जागेतील घर‎ नियमानुकूल करावेत‎

शिरपूर‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लोकसंख्या‎ झपाट्याने वाढत असून, मोठ्या‎ कुटुंबाचे विभाजन होते आहे.‎ त्यामुळे गावात राहण्याची पुरेशी‎ जागा नसल्याने अनेकांनी गायरान‎ जमिनीवर घर बांधले आहे.हे‎ बांधकाम नियमानुकूल करावे, या‎ मागणीसाठी शिरपूर तालुका सरपंच‎ महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी‎ प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली.

‎ या वेळी पंचायत समितीचे‎ सदस्य चंद्रकांत पाटील, मांडळचे‎ सरपंच सुनील माळी, सरपंच‎ महासंघाचे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग‎ सिसोदिया, सरपंच महासंघाचे‎ तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,‎ कळमसरेचे सरपंच रवींद्र राजपूत‎ उपस्थित होते. शिरपूर तालुक्यातील‎ गावा-गावांतील गायरान जागेवरील‎ जुने पक्के घरे नियमानुकूल‎ करण्यात यावे, अशी मागणी‎ करण्यात आली. हा प्रश्न वरिष्ठ‎ अधिकाऱ्यांकडे मांडण्याचे‎ आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिले.‎

बातम्या आणखी आहेत...