आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • The Hunger Of 80 Needy People Is Being Quenched By Spending Eleven Hundred Rupees Every Day For A Thousand Days; So Far 59 Thousand Citizens Have Been Given Free Food Once| Marathi News

दिव्य मराठी विशेष:एक हजार दिवसांपासून रोज अकराशे रुपये खर्च करून ८० गरजूंची शमवली जातेय भूक ; आत्तापर्यंत ५९ हजार नागरिकांना एकवेळचे मोफत भोजन

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सुमन फाउंडेशनतर्फे गरजूंना रोज मोफत अन्नदान केले जाते. हा उपक्रम एक हजार दिवसांपासून सुरू आहे. रोज ७० ते ८० जणांना अन्नदान केले जाते. त्यासाठी रोज अकराशे रुपये खर्च केले जातात. आत्तापर्यंत ५९ हजार गरजूंची भूक या उपक्रमामुळे शमली आहे. हिरे महाविद्यालयात अनेक जण उपचारासाठी येतात. काहींना रुग्णासोबत आठ ते दहा दिवस थांबावे लागते.

इतके दिवस हॉटेलमध्ये भोजन करणे परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांना किमान एका वेळेला सायंकाळी मोफत भोजन मिळावे यासाठी सुमन फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चांडक यांनी मित्र, नातेवाईक व दानशूरांच्या मदतीने मोफत खिचडी वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम फेब्रुवारी २०१९ पासून सुरू आहे. या उपक्रमामुळे दिलासा मिळाला. अनेक दानशूरांची उपक्रमास मदत हिरे रुग्णालयात रोज सायंकाळी मोफत अन्नासाठी १ हजार १०० रुपये खर्च येतो. दानशूर व्यक्तीने दिलेल्या देणगीतून हा खर्च भागवण्यात येतो. अनेक आई-वडिलांचा वाढदिवस, तसेच स्मरणार्थ फाउंडेशनला देणगी देतात. काही जण साहित्याच्या रूपातून मदत देतात. रोज ७० ते ८० जणांना अन्न वाटप करण्यात येते अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...