आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यप:राज्यपालांच्या प्रतिमेला मारले जाेडे; गुजराथी, राजस्थानी नागरिकांमुळेच मुंबई आर्थिक राजधानी

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजराथी, राजस्थानी नागरिकांमुळेच मुंबई आर्थिक राजधानी आहे. ते निघून गेल्यास काही राहणार नाही असे विधान राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे या विधानाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिमेला शनिवारी जोडे मारले. शहरात महापालिका कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. त्यापूर्वी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून माेर्चा काढण्यात आला.

आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल साेनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जाेंधळे, माजी आमदार शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, तालुकाप्रमुख नाना वाघ, मनीष जाेशी, भरत माेरे, नितीन शिरसाठ, विधानसभा संघटक ललित माळी, देवराम माळी, तुषार भामरे आदी सहभागी झाले होते. राज्यपालांवर संविधानिक जबाबदारी असते. पण त्याला महाराष्ट्राचे राज्यपाल अपवाद असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...