आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक झाली. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी मंत्रिमंडळ सदस्यांची निवड केली. निवड करताना उमेदवारांचा शाळेतील विविध उपक्रमातील सहभाग, शैक्षणिक प्रगती व त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विचार करण्यात आला.
शाळेतील आठवी ते बारावीतील ६४ पैकी २८ उमेदवार विजयी झाले. अकरावीसाठी हेड बॉय म्हणून परम कतिरा, हेड गर्ल म्हणून रितिका अग्रवाल यांची निवड करण्यात आली. व्हाइस हेड गर्ल प्रियांशी बाफना, व्हाइस हेड बॉय संजोत सिंग, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री राजवर्धन पाटील, व्हाइस सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अर्णव लोखंडे, क्रीडामंत्री ऋतिका राठोड, व्हाइस क्रीडामंत्री समर्थ घाडगे, असेम्ब्ली मंत्री यमान शहा, असेम्ब्ली व्हाइस मंत्री वंशी बाफना, सफायर हाउस मंत्री अमेय हिरे, व्हाइस हाउस मंत्री भव्य जैन, प्रिफेक्ट दिव्यांशू जैन, कृपा भंडारी, रुबी हाउस मंत्री व्यंकटेश खंडेलवाल, व्हाइस हाउस मंत्री वंश हरसोत, प्रिफेक्ट यश अग्रवाल, टोपाझ हाउस मंत्री रोहन जैन, व्हाइस हाउस मंत्री आदित्य सैंदाणे, प्रिफेक्ट वर्धन डेसरडा, चिन्मय देवरे, एमरल्ड हाउस मंत्री जिवेश सैंदाणे, व्हाइस हाउस मंत्री कुमकुम बिश्नोई, प्रिफेक्ट आरव शिंदे, ऋतिका बावणे, संपादकीय मंडळासाठी मंत्री यशश्री रघुवंशी, व्हाइस संपादकीय मंत्री म्हणून हार्दिक अग्रवाल यांची निवड झाली.
विद्यार्थ्यांना शालेय निवडणुकीचे महत्त्व, मतदानाचा हक्क, लोकशाही प्रक्रिया समजावी या उद्देशाने विद्यार्थ्यांची मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. या चारही हाउसच्या प्रतिनिधींना शपथ देण्यात आली. मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे समाजशास्त्र विभागप्रमुख पांडुरंग पाटील, मनोहर पवार, संजय गलवाडे आदींनी काम बघितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.