आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कार:शहीद जवानावर आज चिंचखेड्यात अंत्यसंस्कार

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील शहीद जवान मनोज लक्ष्मण गायकवाड यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता गावाजवळील गायकवाड यांच्या शेतातच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.

सैन्य दलात ५६ राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये असलेले मनोज लक्ष्मण गायकवाड जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल परिसरात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांचे पार्थिव उद्या सोमवारी चिंचखेडा येथे आणले जाईल. या घटनेनंतर गाव शोकमग्न आहे. गावात रविवारी अंत्यविधीची तयारी सुरू होती. प्रत्येक चौकात शहीद जवान मनोज गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावले आहे. गायकवाड कुटुंबांची सावळी शिवारात शेती असून या ठिकाणी अंत्यसंस्कार होतील. तेथे ओटा बांधण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...