आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:सामूहिक विवाह चळवळीस सामाजिक बळ मिळावे; अनाठायी खर्चही टाळावा; मराठा संघ वधू-वर सूचक, सामूहिक विवाह कक्ष कार्यालयाचे उद्घाटन

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वधू-वर विवाह नोंदणीसह सामुदायिक विवाह चळवळीला सामाजिक बळ मिळावे. विवाहावर अनाठायी खर्च टाळावा. शेतकरी, शेतमजूर, निराधार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक पाठबळ देण्यासह विवाह विषयक मदत मराठा सेवा संघाने करावी, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी केले.

मराठा सेवा संघाच्या वधू-वर सूचक व सामुदायिक विवाह कक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे अध्यक्षस्थानी होते. या वेळी पी. व्ही निकम, जिल्हा मोहीम अधिकारी विलास पवार, कार्यकारी अभियंता पी.जी. पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब भदाणे, खान्देश मराठा पाटील वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष संतोष सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

वधू-वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील, सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, सचिव एस.एम. पाटील, एच. ओ. पाटील, संजय पाटील, नूतन पाटील उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या हस्ते वधूवर सूचक कक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी वधूवर कक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीसह उपाध्यक्ष, जिल्हा संघटक व कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी पी. व्ही. निकम, अविनाश पाटील, बाळासाहेब भदाणे, पी.एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुला-मुलींचे वाढते वय, पालकांच्या उंचावलेल्या अपेक्षा, शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिकांच्या मुलांचा लग्नाचा प्रश्न यावर चर्चा झाली.

प्री-वेडिंग फोटो शूटिंगवर होणारा खर्च, लग्न सोहळ्यात विनाकारण होणारा खर्च टाळावा असे आवाहन करण्यात आले. तसेच याविषयावर मराठा सेवा संघामार्फत प्रबोधन केले जाणार आहे. दुरावलेली मने जोडण्यासाठी समुपदेशनाची सोय करण्यात येणार आहे. या वेळी साहेबराव देसाई, लहू पाटील, डॉ. सुलभा कुवर, प्रा. वैशाली पाटील, सीमा वाघ, अर्चना पाटील, प्रा. बी. ए. पाटील, मिलन पाटील, हेमंत भडक, श्याम निरगुडे, प्रा. सदाशिव सूर्यवंशी, प्रा. उमेश गांगुर्डे, डॉ. सुनील पवार, प्रशांत भदाणे, पी. जी. साळुंखे, अमृत पवार, प्रा. डॉ. भालचंद्र मोरे, उज्ज्वल भामरे, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, नगरसेविका आरती पवार, अरुण पवार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...