आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी परिणाम:उद्योग मित्र समितीची 8 महिन्यांनी होणार बैठक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा उद्योग मित्र समिती अर्थात झूम व जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनर्वसन समितीची उद्या मंगळवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. ही बैठक आठ महिन्यांपासून झाली नव्हती. याविषयी ‘दिव्य मराठी’ने रविवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत ही सभा होते आहे. बैठकीचे पत्र जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापनांनी उद्योजकांना पाठवले आहे.

महापालिका, जिल्हा परिषद, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभाग, औद्योगिक विकास प्राधिकरण आदी विभागांशी निगडित उद्योजकांच्या समस्यांचा निपटारा एकाच ठिकाणी व्हावे या उद्देशाने ही बैठक होते.

महाव्यवस्थापकांचे पत्र
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सातपुडा सभागृहात बैठक होणार असल्याची माहिती उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यू. के. सांगळे यांनी उद्योजकांना कळवली आहे.

बातम्या आणखी आहेत...