आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:एकाच दिवसात किमान तापमान 5 अंशाने वाढले

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून वातावरणात सारखा बदल होतो आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले असून, किमान तापमान एकाच दिवसात ५ अंशाने वाढून १५.६ अंशांवर गेले. दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडी कमी झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. शहरात डिसेंबर महिन्यात वातावरणात बदल होऊन थंडीचा जोर ओसरला. दक्षिण व आग्नेयकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात ढगाळ वातावरण आहे. शहरात सोमवारी रात्री कमाल तापमान ३२ तर किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस होते. आर्द्रता ९४ टक्के झाली आहे. रविवारी रात्री किमान तापमान १० अंश हाेते.

बातम्या आणखी आहेत...