आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:विकास कामांवरील स्थगिती उठवली

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एकवीरादेवी मंदिर परिसरासह अन्य भागात विकास काम करण्यास देण्यात आलेली स्थगिती राज्य सरकारने उठवली असल्याची माहिती आमदार फारुख शाह यांनी दिली. आमदार फारुख शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी धुळे शहर मतदारसंघातील ७३ काेटींच्या विकास कामांवर असलेली स्थगिती उठवण्याची मागणी केली.

त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही स्थगिती उठवली. त्यात नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक बांधकाम, अल्पसंख्याक, पर्यटन, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाशी संबंधित शहरात होणाऱ्या ७३ काेटींच्या कामांचा समावेश हाेता. त्यात एकवीरा देवी मंदिराजवळ तीन काेटींतून भक्तनिवास, सभा मंडप, प्रवेशद्वार उभारणे, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९ काेटींतून रस्ते, पाण्याची टाकी करणे, १२ काेटींतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत उभारणे, ५ काेटींच्या वडजाई राेडसह अन्य कामांचा समावेश होता. सर्व कामे निविदा स्तरावर असून कार्यादेश देण्यात येतील, असे आमदार शाह यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...