आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळाच्या कार्यालयात आंदोलन:शासन योजनांचा लाभ मिळत‎ नसल्याने राष्ट्रवादीचे आंदोलन‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक‎ विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर‎ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक‎ आघाडीतर्फे आंदोलन झाले. मौलाना‎ आझाद अल्पसंख्याक विकास‎ महामंडळाचे कार्यालय नियमित सुरू‎ ठेवावे, कार्यालयात पुरेसे अधिकारी व‎ कर्मचारी नेमावे, मुस्लिम समाजातील‎ उद्योजकांना कर्ज द्यावे आदी‎ मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.‎ पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे‎ भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎ झाले. मौलाना आझाद अल्पसंख्याक‎ विकास महामंडळाची स्थापना मुस्लिम,‎ ख्रिश्चन, बौध्द, जैन, शीख या‎ समाजाच्या विकासासाठी झाली आहे.‎ पण काही दिवसांपासून महामंडळाचे‎ कार्यालय सतत बंद असते.

कार्यालयात‎ पुरेसे अधिकारी, कर्मचारी नाही.‎ व्यापाऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही.‎ अनेक कर्ज प्रकरण अनेक वर्षांपासून‎ प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज‎ मिळत नाही. कार्यालयातील कर्मचारी‎ पिळवणूक करतात. त्यामुळे याविषयाकडे‎ लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन झाले.‎ तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर घ्यावे,‎ मुस्लिम बचत गटांना कर्ज मंजूर करावे‎ अशी मागणी करण्यात आली.‎ आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या‎ अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष‎ अमीन शेख, एजाज शेख, रोशन‎ खाटीक, नजीर शेख, फिरोज पठाण, पीर‎ मोहम्मद शहा, एनाेद्दीन शहा, बरकत‎ शहा, तस्वर बेग, दानिश पिंजारी, अजझर‎ पठाण, आसिफ शेख, जावेद बेग, मेहमूद‎ रमजान आदी सहभागी झाले.‎

बातम्या आणखी आहेत...