आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मुस्लिम समाजबांधवांनी सकाळपासून दुकाने ठेवली बंद; नूपुर शर्मांच्या वक्तव्याच्या विरोधात शहाद्यात निषेध

शहादा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशातील मुस्लिम बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा देशातील विविध मुस्लिम संघटनांनी विरोध दर्शवला. शहाद्यातही त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यासाठी मुस्लिम समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळपासून व्यवहार व दुकाने बंद ठेवली होती.

शहरातील मुस्लिम वस्ती असलेल्या गरीब नवाज कॉलनी, राम रहिम नगर, मिशन शाळेच्या समोरील परिसर, आजाद चौक परिसर, मेमन कॉलनी, बागवान गल्ली, इक्बाल चौक या परिसरांमध्ये व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यात छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने, गॅरेज तसेच हातगाड्यांवरील व्यवसायांचा समावेश होता. केळी व पपई यांच्या खरेदीचे व्यवहारही शुक्रवारी बंद ठेवण्यात आले होते. शहरातील गरीब नवाज कॉलनी, बागवान गल्ली, आजाद चौकात शुकशुकाट पसरला होता. मुस्लिम समाज बांधवांनी निषेध म्हणून आपला व्यवहार बंद ठेवताना कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होणार नाही, काेणाची धार्मिक भावना दुखावणार नाही, याची काळजी घेत शांततेत बंद पाळला. तसे आवाहन समाजाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केले होते. प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले व बांधवांशी संवाद साधला.

वर्दळीच्या ठिकाणी होता वाढीव बंदोबस्त
पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुस्लिम वस्त्या तसेच वर्दळ असलेल्या ठिकाणी वाढीव पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. स्वत: पोलिस निरीक्षक बुधवंत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गस्त करत होते. शांतता राखण्यासाठी मुस्लीम बांधवांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...