आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा:चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याची गरज‎; ​​​​​​​बालराेगतज्ज्ञ डॉ. दरवडे यांचे प्रतिपादन

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थिनींसमोर अभ्यासासह इतर‎ अनेक समस्या असतात.‎ त्याचप्रमाणे पालकांच्या मनात‎ पाल्यांविषयी काही शंका असतात.‎ तसेच मुलांनाही पालकांविषयी‎ त्यांचे विचार मांडावेसे वाटतात.‎ त्यामुळे त्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ‎ असावे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना‎ चारित्र्यसंपन्न शिक्षण मिळणे‎ आवश्यक असल्याचे मत डॉ.‎ अभिनव दरवडे यांनी व्यक्त केले.‎ शहरातील स्त्री शिक्षण संस्थेच्या‎ कमलाबाई कन्या शाळेत विद्यार्थिनी‎ व पालकांसाठी समुपदेशन केंद्र‎ स्थापन करण्यात आले आहे. या‎ केंद्राचे उद्घाटन बालरोग तज्ज्ञ डॉ.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अभिनय दरवडे यांच्या हस्ते‎ करण्यात आले.

त्या वेळी ते बोलत‎ होते. या वेळी मानसोपचार तज्ज्ञ‎ डॉ. तुषार भट, संस्थेच्या अलका‎ बियाणी, उपाध्यक्षा सरोज देशपांडे,‎ सचिव शिल्पा म्हस्कर, सहसचिव‎ अरुणा नाईक, मुख्याध्यापिका‎ मनीषा जोशी, समुपदेशन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ समितीच्या सदस्या डाॅ. कावेरी‎ जोशी, शिक्षक- पालक संघाच्या‎ सचिव डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ.‎ सौख्या चिंगरे, सुषमा दाते आदी‎ उपस्थित होते. समुपदेशन केंद्राचे‎ कायदेशीर सल्लागार अॅड. सारंगी‎ गुजराथी व सदस्य अॅड. विशाल‎ भट आहे. डॉ. दरवडे म्हणाले की,‎ भावनेचे घर शाळा असते.‎ पालकांनी मुलांकडून कमीत कमी‎ अपेक्षा ठेवाव्या.

तसेच आजच्या‎ काळात चारित्र्य संपन्न शिक्षण‎ मुलांना दिले जाणे आवश्यक आहे.‎ मुलांना त्यांचे प्रश्न मोकळेपणाने‎ मांडता आले पाहिजे यासाठी‎ घरातूनच सुसंवाद साधला गेला‎ पाहिजे, असेही ते म्हणाले. डॉ.‎ तुषार भट म्हणाले की, प्रत्येक‎ पालकांनी मुलांना त्यांच्या‎ गुणदोषांसह स्वीकारले पाहिजे.‎ आपला पाल्य कोणत्या गोष्टीत पुढे‎ आहे याचा शोध घ्यावा, असेही ते‎ म्हणाले. कोटा करिअर अकॅडमीची‎ माहिती प्रा .सविता अग्रवाल यांनी‎ दिली. शालिनी चव्हाण यांनी‎ सूत्रसंचालन केले.‎

बातम्या आणखी आहेत...