आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला पत्र:सत्ताधारी नगरसेविकेचेच खड्ड्यात उतरत आंदाेलन ; काम न केल्यास पुन्हा आंदोलन

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याविषयी आता सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही नाराजी व्यक्त करता आहे. त्याचा प्रत्यय शुक्रवारी आला. मॉडेल रस्त्यावरील खड्ड्यात उतरून भाजपच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका कल्याणी अंपळकर यांनी आंदोलन केले.

बारापत्थर ते लेनीन चौकापर्यंतच्या माॅडेल रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी कल्याणी अंपळकर यांनी प्रशासनाला पत्र दिले हाेते. पण काम झाले नाही. या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी शुक्रवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यात आंदोलन केले. आंदोलनात सतीश अंपळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, सुहास अंपळकर, आशा शेवतकर, सुमन चाैगुले, बालीबाई लाेहार, वसंत शिंदे, आबा पगारे, मधु जाधव, कमलेश महाजन आदी सहभागी झाले., बापू चाैधरी, पप्पू अजबे, भूषण माेरे, सतीश सपकाळ, सचिन खैरनार, सचिन देवरे आदी सहभागी झाले होते. दोन दिवसात रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर आयुक्तांच्या दालनात आंदाेलन केले जाईल, असा इशारा नगरसेविका कल्याणी अंपळकर यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...