आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:महामार्गावर उलटलेला कंटनेर दहा तासांनी हटवला‎

कापडणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने ‎फाट्याजवळ गुरुवारी पहाटे कंटेनर ‎ ‎ (एनएल-०१-एएफ-३९३३)‎ उलटला. अपघातात जीवीतहानी‎ झाली नाही पण शिरपूरकडून ‎ ‎ धुळ्याकडे जाणारी वाहतूक देवभाने ‎फाट्यापासून ते शेट्टी पेट्रोल‎ पंपापर्यंत एका बाजूने वळवावी‎ लागली. त्यामुळे महामार्गावरील ‎ ‎ वाहतूक मंदावली होती.‎

मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी ‎पहाटे चार वाजेच्या सुमारास‎ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ‎ ‎ अपघात झाला. कंटनेर धुळ्याकडून ‎ ‎ शिरपूरकडे जात होता. कंटनेर थेट‎ विरुद्ध दिशेला म्हणजे शिरपूरकडून‎ धुळ्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये‎ उलटला. अपघातात चालक जखमी‎ झाला असून त्याला धुळे शहरातील‎ रुग्णालयात दाखल करण्यात आले‎ आहे. अपघातानंतर वाहतुकीची‎ कोंडी झाली होती.

त्यामुळे देवभाने‎ फाट्यापासून एकाच लेनमध्ये‎ वाहतूक वळवण्यात आली होती.‎ अपघातग्रस्त कंटेनर टाटा कंपनीच्या‎ महागड्या चारचाकी गाड्या घेऊन‎ पुणे येथून इंदूरकडे जात होता.‎ अपघातस्थळी देवभाने येथील‎ पोलिस पाटील संदीप नागरे, संदीप‎ माळी आदींनी धाव घेत वाहतूक‎ सुरळीत केली. त्यानंतर महामार्ग‎ पोलिस आले.

त्यांनी वाहतूक‎ सुरळीत करण्यासोबत दोन मोठ्या‎ क्रेन मागवून रस्त्यावर उलटलेला‎ कंटेनर बाजूला केला. महामार्ग‎ पोलिस संजय पाटील, भूषण‎ पाटील, शेखर वाडेकर, पोलीस‎ उपनिरीक्षक खरे उपस्थित होते. या‎ अपघातात कंटनेरमध्ये असलेल्या‎ चारचाकी वाहनांचे मोठ्या‎ प्रमाणावर नुकसान झाले. या‎ घटनेची पोलिस ठाण्यात नोंद‎ करण्यात आली आहे. अपघातानंतर‎ महामार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी‎ झाली असल्याचे दिसून आले.‎

बातम्या आणखी आहेत...