आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:टक्केवारीत शाळांनी गाठली शंभरी ; कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे | बारावीच्या निकालात अनेक शाळा अर्थात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात शहरासह जिल्ह्यातील विविध शाळांचा समावेश आहे. निकालानंतर विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी शाळेचा निकाल १०० टक्के
मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. विज्ञान शाखेतील ११५ पैकी ९७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ९७.५० टक्के लागला. कला शाखेत ८० पैकी ३१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह व ४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत पूनम गिरासेने ८६.१७ टक्के मिळवत प्रथम, वैष्णवी चौधरीने ८६ टक्के मिळवत द्वितीय, यश पाटीलने ८४.८३ टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत कावेरी गवळीने ८४.६७ टक्के प्रथम, सपना पाटील ८३.१७ टक्के द्वितीय, वैभव कोकणे ८२.८३ टक्के तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन विनायक शिंदे, प्राचार्य आर.व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक के. आर. सावंत, पर्यवेक्षक एस. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
‘निकम’चा १०० टक्के निकाल

गोंदूर येथील ओंकार बहुउद्येशिय विकास संस्था संचलित आर.ओ. निकम कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेत कौशल चिंचोलेने ८१.१६ टक्के गुण संपादित करत प्रथम, अनुष्का पवारने ७७.५१ टक्के गुण मिळवत द्वितीय, स्नेहल कन्नेवाडने ७७.१५ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. वेदांती तांबे ७६.५ टक्के गुण प्राप्त करून चतुर्थ क्रमांक मिळवला. गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, सचिव प्रा.शुभांगी निकम, प्राचार्य अमित सिंहल, प्राचार्य सागर जाधव, प्राचार्य अनंत वाघ, प्राचार्य नितेश बडगुजर, प्राचार्य गणेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. जो. रा. सिटी महाविद्यालयाचा ९८.५३ टक्के लागला निकाल

शहरातील जो. रा. सिटी हायस्कलचा निकाल ९८.५३ टक्के लागला. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. ऋषीकेश अहिररावने ९०.१७ टक्के गुण मिळवून प्रथम, धनश्री देवरेने ८८.८३ टक्के गुण मिळवत द्वितीय, वैष्णवी जोशीने ८६.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९९.६२ टक्के लागला. ऋतुजा जैनने ८६ टक्के गुण मिळवत प्रथम, आनम शेख व कशिश नेहताने ८०.८३ टक्के गुणासह द्वितीय, पुष्पक देवरेने ८०.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेचा निकाल ९४.७० टक्के लागला आहे. पूर्वा केदारने ८६.८३ टक्के गुण मिळवत प्रथम, भूमिका राठोडने ८६.६७ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला.

दोंडाईचा : भावेश बागूल प्रथम
दोंडाईचा | येथील स्वाेद्धारक विद्यार्थी संस्थेच्या राऊळ दौलतसिंहजी मल्टिपर्पज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. विज्ञान शाखेतून ४४२ पैकी ४३८ उत्तीर्ण विद्यार्थी झाले. शाळेचा निकाल ९९.०९ टक्के लागला. भावेश सुरेश बागूलने ९२.१७ टक्के मिळवून प्रथम, दिव्या महेंद्र इंदानीने ९१.५१ टक्के गुण मिळवून द्वितीय, स्पंदन विशाल भामरेने ९० टक्के गुण मिळवत तृतीय, सर्वेश उमेश गुजराथीने ८८.६७ टक्के गुण मिळवत चतुर्थ, वेदांत भूपेंद्र बाविस्करने ८८.५० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवला.

व्यवसाय अभ्यासक्रम विभागात ४७ पैकी ४४ उत्तीर्ण झाले. निकाल ९३.६२ टक्के लागला. या विभागात रितेश रणजित राजपूतने ६६.१७ टक्के, प्रिया भटू चव्हाण ६४ टक्केे, लालसिंग गंगाराम पावराने ६३.१७ टक्के गुण मिळवत अनुक्रमे, प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांना स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, मानद सचिव तथा माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, सचिव सी. एन. राजपूत, सामान्य प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, सहाय्यक सचिव व प्राचार्य डी. एन. जाधव, विकास अधिकारी आर. टी. गिरासे, उपप्राचार्या एस. एन. पाटील, एस. के. चंदने, एस. आर. भावसार, ए. टी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

साक्रीतील विद्यार्थीही चमकले
साक्री | येथील विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. विज्ञान शाखेचा निकाल ९५.९६ टक्के, कला शाखेचा निकाल ७९.०६ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९५.७४ टक्के लागला. सर्व शाखा मिळून ९०.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत जान्हवी अजित सोननीसने ८५.३३ टक्के, नियती अनंत पाटीलने ८४.१७ टक्के, रिया विजय पगारने ८४.१७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.

कला शाखेत संगीता संजय चौधरीने ७२ टक्के, संजना सुनील चौधरीने ६९.८३ टक्के, सारिका अरुण चौधरीने ६७.८३ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत गायत्री प्रेमराज पाटील ६५.५० टक्के, सानिका रावसाहेब देसलेने ६३.५० टक्के व सुमीत संतोष ससलेने ५९ टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांना विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील, अध्यक्षा मंगला सुरेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रजित सुरेश पाटील, प्राचार्य डॉ. डी.एल. तोरवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, पर्यवेक्षक प्रा. डी. पी. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाराणा प्रताप कॉलेजचा निकाल १०० टक्के
शहरातील महाराणा प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतील रुद्राणी कोठावदेने ७३.८३ टक्के गुण मिळवत प्रथम, नंदिनी तवरने ७१.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय, महेश बागूलने ६९.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

निजामपूर केंद्रातून अदिती सोनवणे प्रथम
निजामपूर | येथील आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.५२ टक्के लागला. निजामपूर केंद्रातून अदिती महेश सोनवणेने ८९.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. विज्ञान शाखेचा निकाल ९९.४९ टक्के लागला. शाखेत अदिती महेश सोनवणेने ९७.५२ टक्के गुण मिळवून प्रथम, हिमांशू संदीप पाटीलने ८६ टक्के गुण मिळवून द्वितीय, दिव्या रितेश शाह व हर्षदीप नारायण नांद्रेने ८४.५० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला आहे.

वाणिज्य शाखेचा निकाल ९६.६१ टक्के लागला. मोनिका शरद बोरसेने ८४.६७ टक्के गुण मिळवून प्रथम, प्रियंका आनंदा जाधवने ८८ टक्के गुण मिळवून द्वितीय, प्रशांत विलास माळी व माधुरी शांताराम खैरनार यांनी ८१.६७ टक्के गुण मिळवून संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेचा निकाल ९५.२७ टक्के लागला. सविता बापू थोरातने ७८.५० टक्के गुण मिळवून प्रथम, सुरेखा खंडू कोळेकरने ७६.६७ टक्के मिळवून द्वितीय, सीमा चतुर वाघने ७६.३३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. किमान कौशल्य विभागाचा निकाल ९८.४१ टक्के लागला. दीपक माधव खैरनारने ६६.६६ टक्के गुण मिळवून प्रथम, सुनील छोटूलाल सूर्यवंशीने ६६.१६ टक्के मिळवून द्वितीय, ओमकार जयराम गाढेने ६३.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवल्याची माहिती. प्राचार्य आर. जी. सोंजे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...