आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांची तपासणी:जिल्हाभरात पोलिसांनी केली रात्री नाकाबंदी

धुळें25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या आदेशाने मंगळवारी रात्री जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली. ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्यांसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना अडवले जात होते.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गेल्या आठवड्यात पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी विविध १७ पोलिस ठाण्यांना दोन दिवसापूर्वी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार मंगळवारी रात्री ९ पासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली. ठिकठिकाणी पोलिस वाहनांची तपासणी करत होते.

बातम्या आणखी आहेत...