आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ:शहादा शहरसह परिसरात पावसाची हजेरी; भाविकांची उडाली तारांबळ

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने १ सप्टेंबर रोजी पहाटेस जोरदार हजेरी लावल्याने पिकांना लाभदायक ठरणारा पाऊस असल्याने शेतकरी आनंदित झाला मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

पहाटेस अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने ठिक ठिकाणी पावसाचे पाणी साचले. ज्वारी मका या पिकांच्या कणसांमध्ये वाढ होण्यास मदत होईल. पण मे महिन्यात लावलेला कापूस ओला झाल्याने काहीशा प्रमाणात नुकसान झाले आहे. पण या पावसामुळे शेती पिकांना दिलासा मिळाला आहे. तर शहरात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. ज्या गणेश मंडळांनी आरास व देखावा केला आहे त्यांचे मंडप ओले झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...