आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील तहसील कार्यालयामार्फत नगर भवनात १ ऑगस्ट या महसूल दिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मान केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी मनीषा खत्री होत्या. यावेळी प्रांताधिकारी मीनल करनवाल, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पालिकेचे मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप, दिलीप कुलकर्णी, एस.एल. चिखले, तलाठी राजेंद्र साबळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मनिषा खत्री, प्रांताधिकारी करनवाल, तहसीलदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक भापकर, मुख्याधिकारी मुधलवाडकर यांनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान केला.
रेशन दुकानदारांना ओळखपत्र
यावेळी पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानदार यांना ओळखपत्र तसेच भाव फलक देण्यात आले. आधार कार्ड व मतदान कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक तहसीलदार कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन नायब तहसीलदार पाडवी व जगताप यांनी केले तर आभार नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
महसूल नायब तहसीलदार सुरेखा जगताप, प्रताप मराठे, संतोष जाधव, गोपाल चौधरी, गणेश बेदरकर, रोहिणी वळवी, देविदास गावीत, सुकलाल गावीत, रविकिरण गांगुर्डे, पल्लवी कुलकर्णी, पोलिस पाटील कोलदा, अभेसिंग वसावे, पोलिस पाटील अनिल गावीत, शिपाई तहसील कार्यालय रमेश वसावे, कोतवाल रमेश गावीत, कोतवाल सतीश नाईक, उर्मिला गावीत, अजित वळवी, परशराम कोकणी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.