आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:आरक्षण बदलाने धक्का, आता सुरक्षित प्रभागाचा शोध; शिरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

शिरपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येथील नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीमुळे काही प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला तर काहींना दिलासा मिळाला. ज्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले त्यांना आता सुरक्षित प्रभाग शोधावा लागेल. काही जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने प्रस्थापित नगरसेवकांना पत्नी किंवा घरातील अन्य महिलेला रिंगणात उतरवावे लागणार आहे.

येथील नगरपालिकेच्या हॉलमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी प्रमोद भामरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, अभियंता माधव पाटील, सहायक निवडणूक अधिकारी भाईदास मोरे, सागर कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, नगरसेवक राजू गिरासे, दीपक माळी, इरफान मिर्झा, पिंटू शिरसाठ, शिवसेनेचे राजू टेलर, भरतसिंग राजपूत, मनोज धनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. मनोज महाजन, रमेश करंकाळ, अ‍ॅड. अमित जैन, काँग्रेसचे उत्तमराव माळी, संजय चौधरी, राजेश सोनवणे, अमोल पाटील, श्यामकांत ईशी आदी उपस्थित होते. आरक्षण सोडत खुशी माळी व भावेश धनगर या मुलांच्या हस्ते काढण्यात आली. प्रत्येक भागात एक जागा महिलेसाठी राखीव असेल. एससी प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक ७ व १३ तर एसटी प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १२, १४ व १६ राखीव असेल. आरक्षण सोडतीवर १५ जूनपासून हरकती नोंदवता येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक
सोडतीमुळे काही प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला. त्यामुळे काहींवर दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. सर्वच प्रभागांमध्ये एक जागा सर्वसाधारण उमेदवारासाठी असल्याने वजनदार नगरसेवकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. एका प्रभागातून दोन सदस्य निवडून येतील. काही प्रस्थापित नगरसेवकांना पत्नी किंवा नातेवाइकाला उमेदवारी देऊन निवडणूक लढवावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...