आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्नाची बाजू:मनपा गाळे हस्तांतराचा तिढा लवकरच सुटणार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचे शहरात विविध भागात व्यापारी संकुल आहे. संकुलातील भाडे कराराने दिलेले गाळे अनेकांनी नियमबाह्यपणे परस्पर विक्री करून हस्तांतरित केले आहे. आता त्या गाळ्यांची माहिती बाजार विभागाकडून संकलित करण्यात येत आहे. तर हस्तांतरणाची फी आकारणी अधिक असल्याने त्यावर महासभेत धोरणात्मक निर्णय मनपा प्रशासन घेणार आहे. ही रक्कम लाख रुपयापेक्षा कमी असू शकते. त्याचप्रमाणे वार्षिक भाडेच्या पाच पट ऐवजी एक ते दोन पट असाही पर्याय त्यात घेऊ शकते. निर्णय घेताना ती व्यवहार्य ठरेल याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.

महापालिकेने फार पूर्वीपासून व्यापारी संकुल बांधले असून, त्यातील गाळे महापालिका प्रशासनाने वार्षिक भाडे राराने दिलेले आहे. त्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्न प्राप्त होते; परंतु हे कराराने दिलेले गाळे अनेकांनी परस्पर त्यांच्या स्तरावर विक्री करून हस्तांतरण केले आहे; परंतु ते मनपाच्या बाजार विभागातून जोपर्यंत फी भरून हस्तांतरणाची नियमाप्रमाणे प्रक्रिया होत नाही. तोपर्यंत ते गाळे मूळ मालकाच्या नावावरच कागदोपत्री आहे; परंतु त्यांची लाखो रुपयांत विक्री होत असल्याचे व्यवहार झालेले आहे. याप्रकरणी स्थायी समिती सभेत नागसेन बोरसे यांनी प्रशासनाने असे किती गाळे हस्तांतरण झाले याची माहिती घ्यावी, अशी मागणी केली होती.

त्यानुसार मनपाने बाजार विभागाला माहिती घेण्याचे आदेश दिले आहे. बाजार विभागाकडे हस्तांतरण प्रक्रिया नियमाप्रमाणे गाळेधारक करीत नाही. कारण हस्तांतरणाची फी अधिक होत आहे. याकरिता परस्पर हे व्यवहार सुरू आहे. त्याकरिता आता महापालिका व्यापारी संकुलाचा सर्व्हे करून असे किती गाळे आहे. याची माहिती घेऊन त्यावर हस्तांतरणाची फी किती घ्यावयाची याचा निर्णय घेणार आहे.

महापालिकेचे शहरामध्ये साधारणपणे ७०० गाळे
शहरात महापालिकेच्या मालकीचे १७ ते १८ व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलात साधारणपणे ७०० ते ८०० गाळ्यांची संख्या आहे. ते वार्षिक भाडे कराराने देण्यात आले आहे. मात्र यात अनेकांनी गाळयांची विक्री केलेली आहे. एकच गाळा अनेकांकडे विक्री झाल्याने गाळ्याचा खरा मालक कोण याची मनपा शोध घेणार आहे.

गाळे हस्तांतरण फी वार्षिक भाडेच्या पाच पट
महापालिकेचे गाळे दुसऱ्या व्यक्तीला देताना हस्तांतरण करताना त्याची रितसर नोंद महापालिकेत करणे आवश्यक आहे. हे हस्तांतरण करताना हस्तांतरण फी गाळ्याच्या वार्षिक भाडेच्या पाचपट भरावी लागते. याचाच अर्थ पाच वर्षाचे भाडे इतके ही फी असल्याने आर्थिकदृष्ट्या ती परवडणारी नसल्याने अनेकांनी अंतर्गतच हा व्यवहार करून मोकळे झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...