आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा आरोप:तीन महिन्यांपूर्वी 22 लाखांचा खर्च करून केलेला रस्ता पुन्हा खोदला

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बडगुजर कॉलनी परिसरात तीन महिन्यांपूर्वी एका रस्त्याचे काम झाले. या कामाचे २२ लाखांचे बिल आठ दिवसांपूर्वी देण्यात आले. त्यानंतर आता हाच रस्ता पुन्हा खोदण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आयुक्त देवीदास टेकाळे यांना घेराव घातला. या प्रकरणाची चौकशी करावी तसेच गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डाॅ. सुशील महाजन, राजेश पटवारी, देविदास लोणारी, ललित माळी, नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे आदी उपस्थित होते. शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडले आहे. तसेच शहरात रस्ते चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. महापौर प्रदीप कर्पे यांच्या प्रभागातील बडगुजर प्लॉट भागात तीन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम झाले होते. तसेच ८ दिवसांपूर्वी २२ लाख रुपये ठेकेदाराला देण्यात आले. आता हा रस्ता पुन्हा खोदण्यात आला आहे. रस्ता खराब होता का, काम न करताच बिल काढण्यात आले याची चौकशी करावी, अशी मागणी झाली. तसेच देवपूर, पेठ, कॉलनीतील भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघात वाढले असून सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवावे, रस्ता चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

विरोधकांचे आरोप चुकीचे, असे काहीही झालेले नाही
रस्त्याच्या कामाचे २२ लाखांचे बिल ठेकेदाराला दिल्यावर पुन्हा त्याच रस्त्याचे काम होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. प्रभागात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. प्रशासनाने चौकशी केली आहे. विरोधक केवळ बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळवत आहे.
प्रदीप कर्पे, महापौर

बातम्या आणखी आहेत...