आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचा लागला छडा:दरोड्यातील दागिने 26 वर्षांनंतर मिळाले परत

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महिंदळे शिवारात सुमारे २६ वर्षांपूर्वी पडलेल्या दरोड्यातील दागिने गुरुवारी मूळ मालकाला देण्यात आले.

महिंदळे येथील नीळकंठ माळी यांच्या घरी १९९५ मध्ये दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी ३ तोळ्याचे दागिने लुटून नेले होते. पद्या उर्फे रमेश बाबूराव कटके व त्याच्या १२ सहकाऱ्यांनी हा दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २६ वर्षांनी पोलिसांनी गुरुवारी नीळकंठ माळी यांना ५७ हजार ७२९ रुपयांची २२ ग्रॅम वजनाची व १६ हजार १७ रुपयांची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी परत केली. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय शिंदे व डी. एच. कारकून यांनी हा मुद्देमाल सोपवला.

बातम्या आणखी आहेत...