आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेट पण थेट:लुटीतील संशयिताला केले 5 वर्षांनंतर जेरबंद

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील हेंकळवाडी शिवारात केलेल्या लूटप्रकरणी पाच वर्षांपासून पसार असलेल्या कलिम भोसले याला धुळे तालुका पोलिसांनी अटक केली.

पुणे येथील दत्तात्रय मारुती देशमुख हे ऊसतोड मजूर घेण्यासाठी हेंकळवाडीला आले होते. त्यावेळी देशमुख यांना मारहाण करून सुमारे ७ लाख ९ हजारांचा ऐवज लुटला होता. ही घटना ५ डिसेंबर २०१७ मध्ये घडली होता. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून कलिम पसार होता. तो घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्याला अटक केली. वर्षांनंतर जेरबंद

बातम्या आणखी आहेत...