आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यासह परिसरातील अतिशय काबाडकष्ट करणारा गुजर नाभिक समाज विविध उपक्रमांच्या माध्यमातून इतर समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. लोकशाही पद्धतीने समाजाचा कारभार चालतो. आपसातील विविध तंटे, वाद समाज बैठकीत मिटवले जातात. अनिष्ट प्रथा-परंपरांना फाटा देत नव्या उपक्रमांचा स्वीकार ही या समाजाची ओळख बनली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्यांत हा समाज व्यवसायामुळे विखुरला आहे. मात्र कोणतेही वाद अथवा तंटे असोत विवाह सोहळ्याबाबत निर्णय, काही मतभेद असतील तर ते सारे दरवर्षी डिसेंबरात समाजाच्या वार्षिक बैठकीत कार्यकारी मंडळ एकमुखी निर्णय घेते. तो सर्व मान्य करतात, ही आजपर्यंत ख्याती असून समाजाच्या उपक्रमांचे अनुकरण इतर समाजही करत आहेत. गुजर नाभिक समाज पंच मंडळाचे अध्यक्ष उद्धव जांभळे तर सचिव परमेश्वर चव्हाण आहेत. लग्नातील अनिष्ट प्रथा फाटा लग्नासाठी हुंडा, साखरपुडा, बस्ता, रुखवत, बालविवाह या अनिष्ट प्रथा-परंपरांना पूर्णतः बंदी केली आहे. उत्तरकार्याची पत्रिका न छापणे, रात्रीचे लग्न खर्चीक असल्याने त्यावर बंदी केली आहे. स्त्री जन्माचे स्वागत केले जाते.
सामूहिक विवाह सोहळे वैशिष्ट्य गुजर नाभिक समाजामार्फत सात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले आहेत. त्यात केवळ नाममात्र एक रुपया फी मध्ये एकूण ९९ जोडप्यांचे विवाह पार पडले. विवाह सोहळ्यांसाठी समाजातील प्रत्येकाचे योगदान असते. शुभमंगल कन्यादान योजना, स्वतंत्र महिला मंडळाची स्थापना करून महिलांच्या सबलीकरणावर भर दिलाय.
शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन : स्वतंत्र शिक्षण समिती असून,समाजाला दिशा देत तो एकसंघ ठेवणारे माजी अध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी या समितीची स्थापना केली.आजतागायत तेच अध्यक्ष आहे. मुलांना उच्चशिक्षित करणे,त्यांना आर्थिक मदत, शिष्यवृत्तीसह दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.