आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:शिक्षक दाम्पत्याकडेच चोरट्यांनी भरली शाळा; भरवस्तीतून सहा लाखांचा ऐवज नेला लुटून

दोंडाईचा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील हुडको कॉलनीतील शिक्षक दांपत्याच्या घरात भरदिवास चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ६ लाखांचा ऐवज लांबल्याची घटना बुधवारी घडली. यात रोख रकमेसह सोने, चांदींच्या दागिन्यांचा समावेश आहे.

दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक आनंदा दौलत पाटील व शिक्षिका शालिनी आनंदा पाटील हे हुडको काँलनी मुख्य रस्त्याला लागून राहतात. नेहमीप्रमाणे ते शाळेत गेले असता अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी स्वयपांक घरातील लोखंडी व लाकडी असे दोन दरवाज्याचे कडीकोंडा व लाकडी भाग कापून घरात प्रवेश केला. तीन रूमच्या कपाटांचे लॉक तोडून सहा लाख रूपये किमंतीचे ११५ ग्रँम सोने व वीस हजार रुपये रोख रकमेची जबरी चोरी केली आहे.

नूतन हायस्कुलचे मुख्याध्यापक आनंदा दौलत पाटील यांच्या घरी दिवसाढवळ्या ४५ ग्रँमच्या सोन्याची दोन बांगड्या,३५ ग्रँम वजनाचा गळ्यातील हार, १५ ग्रँम वजनाच्या तीन अंगठ्या, १६ ग्रँम वजनाचे कानातले फुल, ४ ग्रँम वजनाचे मंगळसुत्र, रोख रक्कम वीस हजार रूपयाच्या, असे ऐकून सहा लाखांच्या वरील रकमेची जबरी चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांनी भेट देऊन पहाणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत. घटनास्थळी जमलेल्या शिक्षकांनी काॅलनी व गावात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...