आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:मुख्याध्यापक महामंडळाचे‎ आजपासून होणार अधिवेशन‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ‎ महामंडळाचे ६१ वे राज्यस्तरीय‎ शैक्षणिक अधिवेशन ६ व ७‎ नोव्हेंबरला अहमदनगर येथील‎ यशवंतराव चव्हाण सहकार भवनात‎ होणार आहे. अधिवेशनात‎ मुख्याध्यापक, शिक्षकांच्या‎ समस्यांवर चर्चा होणार आहे.‎ अधिवेशनाचे उद्घाटन‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,‎ महसुल मंत्री राधाकृष्ण विखे‎ पाटील, शिक्षणमंत्री दीपक‎ केसरकर, शिक्षण आयुक्त सूरज‎ मांढरे, शिक्षण संचालक महेश‎ पालकर, शरद गोसावी यांच्या हस्ते‎ होणार आहे.

अधिवेशनात‎ व्याख्यान,विविध शैक्षणिक‎ चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम,‎ सेवाहमी कायदा व मुख्याध्यापक‎ जबाबदारी, कोरोना काळातील‎ शिक्षकांच्या अडचणी व उपाय‎ आदी विषयांवर शोधनिबंध सादर‎ होणार आहे. तसेच गुणवंत‎ मुख्याध्यापकांना पुरस्कार देण्यात‎ येईल.

जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी‎ अधिवेशनाला उपस्थित राहावे,‎ असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे‎ जिल्हाध्यक्ष आर. व्ही. पाटील,‎ सचिव उदय तोरवणे, बी. के. नांद्रे,‎ एस. बी. सूर्यवंशी, विजय बोरसे,‎ डी. के. पवार, उपाध्यक्ष सतीश‎ देवरे, उपाध्यक्ष कैलास बाविस्कर,‎ उपाध्यक्ष दिलीप चौधरी, सहसचिव‎ पी. आर. साळुंखे, विद्यासचिव‎ जगदीश शिंदे, सहविद्यासचिव‎ ज्ञानेश्वर वाघ, कोषाध्यक्ष प्रकाश‎ सोनवणे, सहकोषाध्यक्ष पाटील,‎ ऑडिटर किरण जाधव, एस. एस.‎ ‎भलकार आदींनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...