आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:अफजल खान वधाचा देखावा आकर्षण

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. आता कोरोनाचे निर्बंध नसल्याने गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो आहेे. शहरातील बाबा गणपती मित्र मंडळाने यंदा अफजल खानाच्या वधाचा सजीव देखावा साकारला आहे. हा देखावा आकर्षण आहे. बाबा मंडळाची स्थापना ४४ वर्षांपूर्वी आमदार कै. प्रल्हाद पाटील यांनी केली. त्यांच्या प्रेरणेने माजी उपनगराध्यक्ष कै. बाबा पाटील यांनी बाबा गणपतीला मानाच्या गणपतीचा मान मिळवून दिला. मंडळाच्या वाटचालीत दिलीप पाटील, नगरसेवक मोहन पाटील, कै. किशोर पाटील, कै. प्रवीण पाटील, एकनाथ बोरसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सद्य:स्थितीत मंडळाची धुरा भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, छावा संघटनेचे शहराध्यक्ष अमोल पाटील, बंडू बडगुजर, मनोज शिंपी, रावसाहेब पाटील, नरेश पवार, रोहित शेटे, सचिन पवार, देवेंद्र पाटील, महेंद्र येशी, आबा गुरव, प्रवीण बोरसे, अविनाश पवार,अप्पा पाटील, बंडू बडगुजर, हेमंत बोरसे, कैलास शेटे, चंद्रकांत गुरव, जितेंद्र शिंपी, योगेश धोबी, सुभाष मराठे, पिंटू बोरसे, विनोद सैंदाणे, संभाजी धोबी, गोरख गुरव, मनोज पाटील, चेतन पाटील, मयूर पाटील, सावन सोनवणे, मंदार पाटील, उमेश पाटील, सागर पाटील, कल्याण शेटे, सुनील बोरसे यांच्या हातात आहे. मंडळाने यंदा कोकणातील पेण येथून आकर्षक गणेशमूर्ती आणली आहे. तसेच परिसरातील हनुमानाच्या मंदिरावर रोषणाई केली आहे.

सामाजिक उपक्रमांना दिले जातेय प्राधान्य
मंडळातर्फे रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण, शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप, आपत्तीग्रस्तांना मदत करणे आदी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. मंडळातर्फे गुलालाची उधळण होत नाही.

बातम्या आणखी आहेत...