आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात; शहादा शहरातील विविध शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत

शहादा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. शाळेचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची पालकांचे स्वागत करण्यात आले. तर काही विद्यालयांमध्ये रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले. कोराोनानंतर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा उत्साह होता. असंख्य विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या रॅल्या काढण्यात आल्या.

शेठ.व्ही.के.शहा विद्यालय शहरातील शेठ.व्ही.के.शहा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या व शिक्षण भागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी रंगीबेरंगी फुगे बांधण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील, गटशिक्षण अधिकारी डी. टी. वळवी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, शिक्षण विस्तार अधिकारी योगेश सावळे, प्राचार्य एस.पी.पाटील, उपमुख्याध्यापक संजय भाेई, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना पाटील, विशाल तांबोळी, पर्यवेक्षक आय.एन.चौधरी उपस्थित होते.

शाळेचा पहिला दिवस असल्याने आदल्या दिवशी १४ जून रोजी ग्रामीण भागातील बसेस फेऱ्या निश्चित करण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांची संख्या जस जशी वाढत जाईल त्याप्रमाणे ग्रामीण भागातील सर्व बसफेऱ्या सुरू केल्या जातील. दिनांक १५ जून रोजी पहिल्या दिवशी राज्य शासनामार्फत सुरू केलेल्या मानव विकास विषयांच्या बसेसला प्राधान्यदिल्याचे बसस्थानक प्रमुख संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...